आयुष्यातील गेलेले क्षण काही आपला पिच्छा सोडत नाहीत, कोणत्या ना कोणत्या वलनावर ते डोळ्या समोर उभे रहताताच! आणि नकळत आपण त्या भूतकालात रममाण होऊंन जातो, आणि ह्या आपल्या भूतकालवारी साठी कोणती ही गोष्ट कारणीभूत ठरू शकते....
फार दिवसांपासून मिलिंद बोकिल लिखित शाला या कादंबरी बद्दल ऐकून होतो, आधीच मी Gregory David Roberts लिखित Shantaram चे वाचन चालू असल्यामुळे विचार केला की आधी हातात असलेल्याचा फडशा पाडेंन आणि मगच 'शाळेत जाईंन'. अस नाहीं की Shantaram बोरिंग आहे, infact आज पर्यंत वाचलेल्या Non-Fiction मध्ये सर्वात सुंदर अस पुस्तक मी वाचत होतो, पण शाला या पुस्तका बद्दल ऐकत असलेल्या प्रशंसेमुले माजी उत्सुकता ताणली होती, शेवटी न राहून विचार केला की at least पुस्तक तरी विकत आणून ठेवावे, आणि तसही शांताराम almost संपत आल होत, मी संध्याकाळी तड़क ठाण्याच्या जगदीश बुक डेपो मधून नवी कोरी शाला घेउन आलो. घरी आल्यावर मी पुस्तकाचा एक पान उघडून पाहिल आणि फक्त एका ओलीने माजी उत्सुकता शिगेला पोहचली, पुस्तकाच्या पहिल्याच पानावर लिहिले होते, 'शाळेत गेलेल्या सर्वासाठी'. शेवटी न राहून मी शांताराम तात्पुरते बाजूला ठेवले आणि शाला वाचायला घेतले...
पुस्तकातील कथा जशी जशी उलगडत जाते तस तस धूसर होऊंन professional आणि स्वार्थी जगात हरवलेल्या त्या आठवणी नकळत रम्य अश्या शालेय जगात पुन्हा नेहून बसवतात. पुस्तक वाचतान अनेक असे प्रसंग समोर येतात जे नक्कीच प्रत्येक वाचकाला स्वताचेच घडलेले प्रसंग आपण वाचत आहोत अस वातल्याशिवय राहत नाहीं, आणि म्हणुनच लेखकाने आपल्या प्रातिभेचा उत्तम नमूना पुस्तकाच्या पहिल्याच पानावर 'शाळेत गेलेल्या सर्वासाठी...' अस नमूद करून दिला आहे. कथेतील पात्र जोशी, चित्रे, सुऱ्या, फावाद्या जरी काल्पनिक असतील पण प्रत्येक शाळेत एक जोशी आणि चित्रे असणारच, असणार काय? असतातच!!! आणि प्रत्येक शाळेत एक शिरोडकर असते आणि प्रत्येक शाळेत एक आम्बेकर सुद्धा असते. आणि याला माजी शाला सुद्धा अपवाद नव्हती आणि मी सुद्धा!!!
पुस्तकाच एक एक पान वाचताना मला अगदी शहारून येत होत, वाटत होती की हे सर्व आपल्याच बद्दल आहे, आपणच तो जोशी आहोत आणि चित्रे, सुर्र्या माज्या घनिष्ट परिचयाचे आहेत आणि शिरोडकर ही.... (हा हा हा), शाळेत असताना प्रत्येक इयत्तेत शेवटचे बेंच हे जणू आमच्याच ग्रुप साठी राखीव ठेवले आहेत अस वाटायचा, राहून राहून मला कधीतरी पहिल्या बकावाराच्या मुलांचा हेवा वाटायचा की यांच्या सारखा आपण का इमान्दारित आभ्यास करत नाहीं? पण तो शेवटच्या बेंचचा रुबाब हा मला त्या पहिल्या बेंच वरच्या मुलान्बद्दल वाटत असणार्या हेव्या पेक्षा किती तरी मोठा होता, आणि तो हेवा सुद्धा किती पोकळ होता ते आता कलतय, नुसताच शाळेत जाऊंन फक्त अभ्यास एके अभ्यास आणि घर एके घर केलेल्याना कदाचित ती शालेची खरी गम्मत कधी कललीच नसेल, किवा त्या फर्स्ट बेन्चेर्स ची गम्मतेची व्याख्याच काही निराळी असेल, आसो पण ती गम्मत आमच्या इतकी इरसाल नक्कीच नसेल, ती त्या काचेच्या भान्द्यासराखी गुलगुलीत आणि तितकीच तकलादू आसेल. कदाचित ही प्रत्येक वर्गाची रचनाच असेल की प्रत्येक वर्गात ते पहिल्या २-३ बाकावर बसून चिव चिव करणारे असावेत, आणि प्रत्येक शालेत सुरया-केवडा प्रसंग घडतच असावा.
शाला मी विक्रोली ते ठाणे आणि ठाणे ते कोपेर्खैराने अश्या २-३ लोकल प्रवास फेरीत संपवली आहे, आणि तो प्रवास खरच खुप आरामदायक होता, कारण मी शरीराने जरी त्या गच्च भरलेल्या लोकल मधे असलो तरी मनाने मात्र शालेच्या 'त्या' आठवणीत हरवलो होतो, वाचता वाचता खुदकन हसायला ही येत होत आणि नकळत भरून ही येत होत.
शाला ही एक केवल कादम्बरी नसून ती शाळेत गेलेल्या प्रत्येकासाठी आठवणींची जंत्री आहे, एक अस जग जे परत निर्माण करण हे पुढे कोंत्याच वयात आणि कितीही पैशाने शक्य होत नाहीं, तेव्हा फक्त करियर नावाच्या कठीण अशा गणिताची बेरीज असते आणि भविष्याचा गुणाकर आणि नेमकी बरोबर उत्तरासाठी मागच्या आठवणींची वजाबाकी करावी लागते.
मिलिंद बोकिल यांनी खरच एक अप्रतिम अशी शाला रेखातली आहे, ती शाला तीच शाला आहे ज्यात तुम्ही आणि मी कधी तरी वावरलो होतो.
Hats Off to Milind Sir!!! Great Work, Indeed.