'Freedom of speech' म्हणजे काय हो? बोलण्याचे स्वातंत्र्य कि काहीही बोलण्याचे स्वातंत्र्य? केवळ विधानार्थी बोलणे कि एकदम हमरीतुमरीवर येउन बोलणे? का एकदम कोणाच्या हि भावनांना हिनावणे?
कारण; आता बघा, सुसंस्कृत आणि सुसज्ज अश्या पालघर येथील २ तरुणी जेव्हा अवघा महाराष्ट्र दु:खात बुडालेला असताना, 'मुंबई का बंद केली जाते वगेरे वगेरे' अशे प्रश्नवजा ताशेरे मारून ह्या म्यांडमानी एकट्यात नव्हे तर चक्क थोबाड पुस्तकावर (फेसबुक हो!) अपडेट केलं. अवघ्या जनसागराचा रोष शिगेला पोहचू नये आणि वातावरण तापू नये म्हणून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्या सुसंस्कृत आणि जबाबदार तरुंनी विरुद्ध FIR नोंदवली. आणि नीट विचार केला तर ते योग्य सुद्धा होतंच, कारण कुठे हि अशी घटना समोर नव्हती आली कि मुंबई हि जबरदस्तीने बंद केली जात आहे, ते आपसूकच मुंबईकरांनी केवळ बाळासाहेबांच्या वर्षोनुवर्षे असलेल्या त्या जिव्हाळ्याखातीर केलं, त्यात उगीच कांगावा करण्यासारखं काहीही नव्हतं पण इथे त्या मुलींना अटक नाही झाली तोवर सगळ्यांनी गरळ ओकायला सुरवात केली, कशाच्या नावावर? तर freedom of speech च्या नावावर. इतकच नाही तर याही पुढे जाऊन पोलिसांवर पक्षपातीचा आरोप सुद्धा करण्यात आला... आणि ह्यात आणखी कहर म्हणजे कारवाई करणाऱ्या पालघर पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे आणि ठाण्याचे सुप्रीटेन्द ऑफ पोलिस रवींद्र सेनगावकर यांना निलंबित करण्यात करण्यात आलं (बातमी). का? तर म्हणे चुकीच्या कलमाखाली अटक आणि वरीष्टांचे आदेश न पाळल्यामुळे. अरे पण तुम्ही शांत डोक्याने हा का नाही विचार करत कि पोलिसांनी काही कारवाई जर नसती केली तर त्याचा काय परिणाम झाला असता? जर प्रक्षुब्ध जनतेने काही बर वाईट केलं असतं तर तेव्हा सुद्धा तुम्ही पोलिसांनाच दोषी ठरवला असतं ना?, शांतता आणि सुव्यवस्था न राखण्याच्या नावावर?. ह्या घडलेल्या प्रकारची कोणी अशा बाजूने का नाहीन दाखल घेत आहे? का फक्त पोलिसांवरच उलट्या बोंबा का मारल्या जात आहेत? आणि प्रशासनालाहि आपलीच पडती बाजू आहे असा सिद्ध करून काय मिळणार आहे? ह्या प्रकाराला राजकारण नाही म्हणत, हा तर चक्क मडयाच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार आहे.
असाच एक प्रकार आता हल्लीच घडला आहे, आणि पुन्हा काय तर पोलिस पक्षपातीपण करतात असा फाझील कांगावा चालवला आहे.
आता मुंबई येथे आझाद मैदानाचा ११ ऑगस्ट ला घडलेला प्रकार सगळ्यांनाच आठवत असेल, आठवत काय चांगल्याच मुठी आवळत असतील ऐकूनच, कारण काय घडल होतं आणि कोणी आणि कशासाठी केलं होतं हे सगळ्यानाचं चांगल माहित आहे. पण आपल्या सेक्युलर प्रशासनाने दरवेळे प्रमाणे याही वेळी मावळ धोरण पत्करले.
आता ह्या घडलेल्या प्रकारावर, वाहतूक महिला पोलिस निरीक्षक सुजाता पाटील ह्यांनी मुंबई पोलिसांच्या संवाद ह्या नियतकालिकात लिहिलेल्या कवितेवरून वाद निर्माण झाला आहे. सुजात पाटील ह्यांनी, त्यांच्या कवितेत त्या दिवशी दंगल करणार्यांचा उल्लेख देशद्रोही आणि साप म्हणून केला आहे, ह्यावर त्याच दिवशी पोलिसांनी कारवाई केलेल्या एका मुस्लिम दंगेखोराने आणि काही इतर मुस्लिम संघटनेने आक्षेप घेऊन सदर कविते बद्दल तक्रार नोंदवली आहे. (यालाच चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात का?) पाटील बायिनी लिहिलेल्या कवितेच्या काही ओळी ह्या खालील प्रमाणे आहेत..
हौसला बुलंद था, इज्जत लुट रही थी...
हिम्मत कि गद्दारोने अमर ज्योती को हाथ लगाणे कि,
काट देते उनके हाथ तो फरियाद किसिकी भी न होती
सांप को दुध पिलाकर बात करे हम भाई चारेकी...
त्यांनी असं सुद्धा म्हटलं आहे कि पोलिसांनी अश्या दंगेखोरांचे हाथ कापायला हवे होते, म्हणजे त्यांनी पुन्हा कधी अशी हिम्मत केली नसती.
अशी प्रक्षोभक कविता पोलिसांच्या नियतकालिकात कशीकाय छापली जाऊ शकते अशी आरोळी काही मुस्लिम सामाजिक कार्यकर्त्यांनी लगावली आहे आणि वकील एझाज नक्वी आणि काही मुस्लिम संघटना आता प्रकाशक आणि कवियत्री यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. (बातमी)
पण का हो?? आता कोणी freedom of speech च्या दृष्टीने का नाहीं बघत ह्या प्रकाराला? का पोलिसांना freedom of speech चा अधिकार नाही का?? कि पोलिसांना भावना नसतात? त्या दिवशी भर रस्त्यावर, मोर्च्याचा नावाखाली महिला पोलिसांशी ज्या पद्धतीने हे 'देशप्रेमी' मोर्चेकर वागले त्याला काय म्हणालं पहिले? जया कांबळे नावाच्या गरोदर महिला पोलिसावर जे सामुहिक अत्याचार करण्यात आले ते कोणत्या सभ्यतेचा लक्षण होतं? महिला पोलिसांचे नुसते कपडेच नाही फाडले गेले तर त्यांची अब्रू सुद्धा लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला, हा निषेध करण्याचा कोणता प्रकार आहे? अरे ज्यांनी स्वताच्या आया बहिणींना सोडून तिकडे दुर्गम अशा परिस्थितीत देशाचं रक्षण करता करता आपले प्राण गमावले त्या शहीद स्मारकाला सुद्धा तुम्ही लाथेने हाणता? कसला आलाय इतका राग तुम्हाला? कसली चीड आहे तुम्हाला जी अश्या पद्धतीने तुम्ही मांडत आहात? हा घडलेला प्रकार जेव्हा कळला तेव्हा आपल्या वातानुकुलीत घरात तंगड्या वर करून पडलेल्यांच्या पण जीवाची आग झाली असेल, तर मग का म्हणून आपल्याच खात्यातल्या सहकारी बहिणींची अशी विटंबना झाल्यावर कोणी गप्पं राहावं? लिहिली कविता, केला राग व्यक्त?.... का? असं कागदावर व्यक्त केलेला कवितारुपी राग चालत नाही का? मग कसं 'मोर्चे' काढावे का? जसे ह्यांनी काढले शांततेत?
अरे कसलं आलं आहे हे Double standard? एकीकडे तुम्ही पोलिसांनी केवळ शांतता भंग होऊ नये म्हणून केलेल्या कारवाई वर, पक्षपातीपण म्हणून आक्षेप घेऊन चक्क पोलिसांना निलंबित करता आणि दुसरीकडे झालेल्या अन्यायावर हतबल होऊन जेव्हा काही बोलवा तर तुम्ही त्याही गोष्टीवर ताशेरे ओढून लिहिणार्याकडून 'apology letter' लिहून घेता? का? कसले उदाहरण तुम्ही मांडत आहात दिवस रात्र राबणाऱ्या त्या पोलिसांसमोर? अशेच जर अब्रूचे धिंडवडे निघणार असतील तर चांगलीच मुस्कटदाबी चालली आहे, म्हणजे सो कॉलड सेक्युलर लोकांची चांगलीच चंगळ आहे आता...
सुजाता पाटील ह्या एक स्त्री आहेत , आणि एक स्त्रीच स्त्री वर झालेले अत्याचार समजू शकते, त्यात चूक ती काय? आणि लिहिलेल्या कवितेत त्यांनी फक्त त्या लोकांना साप म्हटलं आहे जे त्या दिवशी तिथे आझाद मैदानावर मोर्च्याचा नावाखाली पोलिसांवर अत्याचार करत होते, यात संपूर्ण मुस्लिम समाज आणि त्यांच्या भांवना कुठून मध्ये आल्या? त्या दिवशी जर असं कृत्य कोणी दुसर्या धर्माच्या व्यक्तीने केलं असतं तर त्याला हि साप असच म्हटलं असतं, त्यात लगेच जात आणि धर्म कुठून आली? आणि लगेच याचिका आणि तक्रारी कुठून आल्या?
हे जे काही चाललं आहे ते फारच चुकीचं आहे, कारण ह्या अश्या प्रकाराने तुम्ही फक्त सत्याला दाबण्याचा प्रयत्न कराल पण ते जितकं दाबाल तितकं ते उफाळून समोर येईल... एकीकडे जर तुम्ही freedom of speech च्या नावाखाली पोलिसांना चिमट्यात पकडता तर दुसरीकडे त्याच freedom of speech च्या नावाखाली तुम्ही पोलिसांचा बचाव का नाही करत? काय आहे काय ह्या freedom of speech ची व्याख्या? जर नेहमीच पोलिसांनाच निशाणा करणार असाल तर पुढे भविष्यात हे फार घातक ठरेल.... as usual फक्त सामान्य माणसाला.
-A Stupid Common Man!!!!
(हे लिखाण फक्त जे चुकतंय ते दाखवण्याच्या दृष्टीने लिहिण्यात आलं आहे, उगीच ह्याला कोणत्याही प्रकारच्या वयक्तिक घ्रुनेशी जोडण्याचा प्रयत्न करू नये -A Stupid Common Man!!!!)
फोटो सौजन्य - गूगल

6 comments:
Everyone is equal.
Interesting message oriented post :) Thank you for sharing his to the world... :)
फारच अप्रतिम तुम्ही तर पितळ उघडे पाडले... कवितेला पण freedom of speech च्या दृष्टीकोनातून पाहिलं पाहिजे...
अप्रतिम दृष्टीकोन,
पितळच उघडे पाडले... freedom of speech कवितेला पण....असायला पाहिजे....
Thank you very much Sonali & Uday.
Mala Hyat Polisanchi kutlyahi prakarchi chuk vatat nahi.pan vayit itakyach goshtiche vatate Sarkar ajun matansathi kiti lachar bananar aahe. Ka gunhegaranna shiksha dili jat nahi Je majtil Tyana ka dakhvun dile jat nahi ki jast maju naka nahi tar.......
Sarkarcha ashya lachar pana mulech aaj dilhi purnapane asurakshit jhali aahe...
Jago Sarkar Jago....!
Very well said Neelesh...
Post a Comment