Powered By Blogger

Thursday, April 22, 2010

SHALA by Milind Bokil (Book Review...Personal View)


आयुष्यातील गेलेले क्षण काही आपला पिच्छा सोडत नाहीत, कोणत्या ना कोणत्या वलनावर ते डोळ्या समोर उभे रहताताच! आणि नकळत आपण त्या भूतकालात रममाण होऊंन जातो, आणि ह्या आपल्या भूतकालवारी साठी कोणती ही गोष्ट कारणीभूत ठरू शकते.... 



फार दिवसांपासून मिलिंद बोकिल लिखित शाला या कादंबरी बद्दल ऐकून होतो, आधीच मी Gregory David Roberts लिखित Shantaram चे  वाचन चालू असल्यामुळे विचार केला की आधी हातात असलेल्याचा फडशा पाडेंन आणि मगच 'शाळेत जाईंन'. अस नाहीं की Shantaram  बोरिंग आहे, infact आज पर्यंत वाचलेल्या Non-Fiction मध्ये सर्वात सुंदर अस पुस्तक मी वाचत होतो, पण शाला या पुस्तका बद्दल ऐकत असलेल्या प्रशंसेमुले माजी उत्सुकता ताणली होती, शेवटी न राहून विचार केला की at least पुस्तक तरी विकत आणून ठेवावे, आणि तसही शांताराम almost संपत आल होत, मी संध्याकाळी तड़क ठाण्याच्या जगदीश बुक डेपो मधून नवी कोरी शाला घेउन आलो. घरी आल्यावर मी पुस्तकाचा एक पान उघडून पाहिल आणि फक्त एका ओलीने माजी उत्सुकता शिगेला पोहचली, पुस्तकाच्या पहिल्याच पानावर लिहिले होते, 'शाळेत गेलेल्या सर्वासाठी'. शेवटी न राहून मी शांताराम तात्पुरते बाजूला ठेवले आणि शाला वाचायला घेतले... 

पुस्तकातील कथा जशी जशी उलगडत जाते तस तस धूसर होऊंन professional आणि स्वार्थी जगात हरवलेल्या त्या आठवणी नकळत  रम्य अश्या शालेय जगात पुन्हा नेहून बसवतात. पुस्तक वाचतान अनेक असे प्रसंग समोर येतात जे नक्कीच प्रत्येक वाचकाला स्वताचेच घडलेले प्रसंग आपण वाचत आहोत अस वातल्याशिवय राहत नाहीं, आणि म्हणुनच लेखकाने आपल्या प्रातिभेचा उत्तम नमूना पुस्तकाच्या पहिल्याच पानावर 'शाळेत गेलेल्या सर्वासाठी...' अस नमूद करून दिला आहे.  कथेतील पात्र  जोशी, चित्रे, सुऱ्या, फावाद्या जरी काल्पनिक असतील पण प्रत्येक शाळेत एक जोशी आणि चित्रे असणारच, असणार काय? असतातच!!! आणि प्रत्येक शाळेत एक शिरोडकर असते आणि प्रत्येक शाळेत एक आम्बेकर सुद्धा असते. आणि याला माजी शाला सुद्धा अपवाद नव्हती आणि मी सुद्धा!!!

पुस्तकाच एक एक पान वाचताना मला अगदी शहारून येत होत, वाटत होती की हे सर्व आपल्याच बद्दल आहे, आपणच तो जोशी आहोत आणि चित्रे, सुर्र्या माज्या घनिष्ट परिचयाचे आहेत आणि शिरोडकर ही.... (हा हा हा), शाळेत असताना प्रत्येक इयत्तेत शेवटचे बेंच हे जणू आमच्याच ग्रुप साठी राखीव ठेवले आहेत अस वाटायचा, राहून राहून मला कधीतरी पहिल्या बकावाराच्या मुलांचा हेवा वाटायचा की यांच्या सारखा आपण का इमान्दारित आभ्यास करत नाहीं? पण तो शेवटच्या बेंचचा रुबाब हा मला त्या पहिल्या बेंच वरच्या मुलान्बद्दल वाटत असणार्या हेव्या पेक्षा किती तरी मोठा होता, आणि तो हेवा सुद्धा किती पोकळ होता ते आता कलतय, नुसताच शाळेत जाऊंन फक्त अभ्यास एके अभ्यास आणि घर एके घर केलेल्याना कदाचित ती शालेची खरी गम्मत कधी कललीच नसेल, किवा त्या फर्स्ट बेन्चेर्स ची गम्मतेची व्याख्याच काही निराळी असेल, आसो पण ती गम्मत आमच्या इतकी इरसाल नक्कीच नसेल, ती त्या काचेच्या भान्द्यासराखी गुलगुलीत आणि तितकीच तकलादू आसेल. कदाचित ही प्रत्येक वर्गाची रचनाच असेल की प्रत्येक वर्गात ते पहिल्या २-३ बाकावर बसून चिव चिव करणारे असावेत, आणि प्रत्येक शालेत सुरया-केवडा प्रसंग घडतच असावा. 
   
शाला मी विक्रोली ते ठाणे आणि ठाणे ते कोपेर्खैराने अश्या २-३ लोकल प्रवास फेरीत संपवली आहे, आणि तो प्रवास खरच खुप आरामदायक होता, कारण मी शरीराने जरी त्या गच्च भरलेल्या लोकल मधे असलो तरी मनाने मात्र शालेच्या 'त्या' आठवणीत हरवलो होतो, वाचता वाचता खुदकन हसायला ही येत होत आणि नकळत भरून ही येत होत. 

शाला ही एक केवल कादम्बरी नसून ती शाळेत गेलेल्या प्रत्येकासाठी आठवणींची जंत्री आहे, एक अस जग जे परत निर्माण करण हे पुढे कोंत्याच वयात आणि कितीही पैशाने शक्य होत नाहीं, तेव्हा फक्त करियर नावाच्या कठीण अशा गणिताची बेरीज असते आणि भविष्याचा गुणाकर आणि नेमकी बरोबर उत्तरासाठी मागच्या आठवणींची वजाबाकी करावी लागते.

मिलिंद बोकिल यांनी खरच एक अप्रतिम अशी शाला रेखातली आहे, ती शाला तीच शाला आहे ज्यात तुम्ही आणि मी कधी तरी वावरलो होतो. 

Hats Off to Milind Sir!!! Great Work, Indeed. 


11 comments:

sHoNa said...

Amazing mr. nair.... I loved reading all your blogs, especialy dis1...coz dis topic is close 2 my heart..i guess its very uniform to every1.@shala, et al: Seriously, I know i once thought it was funny to read it .... . Many times when you wrote at ur blog most of d stuff mentioned in shala , I found myself in agreement with you. ... i'm shocked (e.g = नुसताच शाळेत जाऊंन फक्त अभ्यास एके अभ्यास आणि घर एके घर केलेल्याना कदाचित ती शालेची खरी गम्मत कधी कललीच नसेल.)basicaly i belong to dis category...enyway its realy real story...

.... I do appreciate the links to the lists above so I can look for more blogs .

hv gd day.
tc.

darshanaw said...

hey...mastach....chan lihile.....keep it up

Unknown said...

Hey Shona, Thx yaar. As I mentioned it wasnt juz book so does my review. It is my personal view, cuz I knw I have lived this life at school... I juz cherish those moments and I appreciate this book for reminding me all it again...

Unknown said...

Doctor... Thx a lott yaar, Thx for dropping by.

Anonymous said...

Amiable dispatch and this post helped me alot in my college assignement. Gratefulness you seeking your information.

sHoNa said...

Award for you :)
http://lolalyf.blogspot.in/2012/03/again-one-more-award.html

Anonymous said...

पूर्वी शब्दांपेक्षा भावनेला खूप खूप महत्व असायचे ,
कारण तेव्हा माणस भावना प्रधान होते,
पण आता शब्दांना अतिमहत्व प्राप्त झाले आहे
कारण आता माणस भावना शून्य होत चालले आहेत...
... त्यामुळेच आता
...खूप वेळा खोटेच रडावं लागत
खूप वेळा खोटेच हसावं लागत
अनेक ठिकाणी खोटेच लिहाव लागत
बऱ्याच वेळी खोटेच बोलाव लागत

आणि ह्यामुळेच
हया संघर्षमय जीवनात सुखाने जगायचं असेल
तर मन दगडाचे असाव लागत ... !!

Anonymous said...

आज पण कधी शाळेजवळून गेलो कि त्या शाळेचे जुने दिवस आठवतात.........

शाळेचे ते दिवस पुन्हा कधी परत येणार नाही ..........

खरच खूप आठवण येते शाळेची, शिक्षकांची आणि शाळेतील मित्रांची......

जीवनातील सोनेरी दिवस पुन्हा कधी परत येणार नाही का

Anonymous said...

i am not much familiar with Marathi language..it wld be helpful if you assist with translator.Love to Read & comment.

Regard,
Priya M
http://thislifeilove.wordpress.com

samidha v. ( pushpanjali karve ) said...

Too good... I also enjoyed these days... I never forget these days... Milind bokil show a mirror of inocence......! But today these inocence things are missing.....!!!

Unknown said...

Thank you very much Samidha for dropping by :)